शिरूर अनंतपाळ चे भुमीपुत्र लखनगावे यांचे हैद्राबाद येथे मदत कार्य


शिरूर अनंतपाळ चे भुमीपुत्र सुधीर लखनगावे यांचे हैद्राबाद येथे मदत कार्य


शिरूर अनंतपाळ चे सुपुत्र श्री सुधीर धनाजीराव लखनगावे हे औषध निर्माण शास्त्रातील उच्चशिक्षित असुन  सध्या ते हैद्राबाद येथील नामांकित औषध कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत असुन ते सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असता. कोरोना च्या या लढाई मध्ये नागरिकांना स्वखर्चाने सामाजिक बांधिलकी कायम ठेवत 3500 मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर्स व गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू चे कीट चे वाटप सुधीर लखनगावे यांच्या वतीने हैद्राबाद येथे करण्यात आले. 
                      यावेळी हैद्राबाद महानगरपालिकेचे नगरसेवक ॲड. श्री. राम रेड्डी, कॉंग्रेस चे स्थानिक ब्लॉक प्रमुख श्री नविन रेड्डी, खुदबु बागवान व इतर मित्र मंडळी यांची उपस्थिती होती.