रमजान पवित्र सणानिमीत्त मुस्लीम बांधवांना मास्क व फळवाटप
शिरुर अनंतपाळ :- रमजानच्या पवित्र महिन्या निमीत्ताने शहरातील युवा सामाजीक कार्यकर्ते महादेवराव आवाळे व सुचीतभाऊ लासुणे यांच्यावतीने शहरातील मुस्लीम बांधवांना मास्क व फळवाटप करन्यात आले.
कोरोना विषाणु संसर्गामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामूळे सर्व धार्मीक स्थळे बंद आहेत.यामध्ये सर्व मशिद बंद असल्या कारणाने प्रतीवर्षी येनारी ईफ्तार पार्टी देणे शक्य नसल्यामुळे शहरातील युवा सामाजीक कार्यकर्ते महादेवराव आवाळे व सुचीतभाऊ लासुणे यांच्यावतीने घरोघरी जावुन मुस्लीम बांधवांना पवित्र रमजान निमीत्त ईफ्तार साठी फळे व कोरोणा संसर्गापासुन बचावाकरीता अत्यावश्यक असनारे मास्क वाटप केले.व ईस्लाम धर्मातील धर्मगुरे प्रेषीत मोहंमद पैगंबर यांचे जन्मस्थळ व समाधीस्थळ असलेल्या मक्का - मदिनाची प्रतीमा भेट देवुन रमजानच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक यशवंतअण्णा आवाळे,जलुसाब तांबोळी,उदय बावगे,गजानन देवशटवार,आलीम तांबोळी,जावेद तांबोळी,गणी तांबोळी,ईनायतुल्ला मौजन,नासेर मुजेवार,सिकंदर तांबोळी,महेबुब तांबोळी,बाबा तांबोळी,अस्लम तांबोळी,खमरोद्दीन मुजेवार,शाएकभाई उजेडे आदी मुस्लीम बांधव यावेळी ऊपस्थीत होते...