वन विभाग शेतात खड्डे मारत असल्याची तक्रार
निलंगा: निलंगा तालुक्यातील वांजरवाडा (शि.) येथे वन विभागाची सर्व्हे. न. 107, 108 मध्ये जमीन आहे. त्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे मारण्याचे काम चालू आहे. तसेच याच सर्व्हे नं मधील जमीन 1975 पासुन बब्रुवान इस्माईल गवारे, विश्वनाथ भुजंगा गवारे, चमाबाई निळकंठ गवारे कसुन खात आहेत. व त्याच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा म्हणून शासन दरबारी व निलंगा दिवाणी न्यायालयात न्याय मागत आहेत. असे असताना वन विभागाने वरील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात खड्डे मारत असताना वन विभागाच्या कर्मच्याऱ्यांना आडवुन काम थांबवले. व सदरील जमिनीचा मा. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत वन विभागाने काम थांबवावे अशी तक्रार निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.