अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा



निलंगा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पर्जनवृष्टी व्हावी म्हणून ग्रामदैवत नीळकंठेश्वर मंदिरात महाभिषेक करण्यात आला. ८ वाजता पीरपाशा दर्गा येथे चादर आर्पण करुन प्रार्थना करण्यात आली. अशोक बंगला येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर मातोश्री सुशीलाबाई पाटील यांचे आशीर्वाद घेऊन ९ वाजता परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन, ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. १० वाजता महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शालेय साहित्याचे वाटप व वह्यांचे वाटप करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता आर्चीड अकॅडमीमध्ये केक कापून वह्याचे वाटप, ११ वाजता महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात वक्षारोपण व रक्तदान शिबिर, ११.३० परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भंतेजी धम्मसागर यांच्या उपस्थितीत आशोकनगर, मिलींद नगर. आंबेडकरनगर येथील मित्र परिवाराच्या वतीने बुध्दवंदना व अभिष्टचिंतन करण्यात आले. १२.१५ वाजता शहरातील मुस्लिम बांधवाच्या वतीने दर्गा येथे चादर चढवून प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमासाठी दयानंद चोपणे, प्राचार्य व्ही. एल.एरंडे,प्रा.भागवत पौळ, एस. एस. पाटील, मुख्याध्यापक बी. एन. पाठक, पी.पी. गायकवाड, प्रा. सी.जे.कदम, अजगर अंसारी, सिराज देशमुख, महमदखान पठाण, नजीर शेख, अॅड. विक्रांत सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, रोहीत बनसोडे, रोहण सुरवसे, अरविंद कांबळे, इंद्रजित कांबळे, अमोल सोनकांबळे, प्रा. गजेंद्र तरंगे, आशोक शेटकार, अॅड. वीरभद्र स्वामी, देविदास जाधव, अनिल अग्रवाल, नवनाथ कुडंबल यांनी आयोजित केला. उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद येथील पदाधिकारी मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या. भ्रमणध्वनीवरुन माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, राजीव वाघमारे, आमदार विक्रम काळे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार ईश्वर खंडारे, आमदार प्रणित शिंदे, आमदार, डी.के सावंत, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे, शैलेश पाटील चाकूरकर, अॅड. व्यंकट बेद्रे, आमदार बस्वराज पाटील, आमदार मधुकर चव्हाण, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.