माणसा माणसातील नितिमत्ता हरवत चाललीय : आचलिया
देवणी : न्यायालयारील विश्वास तसूभरही कमी झाला नाही परंतू माणसा माणसातील नितीमत्ता हरवत चालली आहे त्यामुळे न्यायालयावरील भार दिवसेंदिवस वाढत आहे यापूर्वी सर्वसामान्य माणसे एक वचनी होते त्यामुळे गावातील तंटे गावातच मिटत होते अशी परिस्थिती राहिली नाही दिवसे दिवस नितीमत्ता हरवत चालली आहे असे मत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक लातूर न्याय मूर्ती विजय एल आचलिया यांनी देवणी येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्थर बांधकाम कोनशिला अनावरण सोहळा समारंभात केले.
न्यायमूर्ती आचलिया पुढे म्हणाले की नवीन न्यायालाय मंजूर झाले तेव्हा मिळेल त्या जागेत न्यायालय सुरू केले न्यायदान करणाऱ्या कुठल्याच न्यायधीश वकील व संबंधित कर्मचारी यांना कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत गुन्हाच्या गोठ्यासारख्या जुन्या इमारतीत आमच्या सहकार्याने न्यायालये चालविली मी सातत्याने न्यायालायची स्वतःची इमारत कशी उभी करता येईल यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून कोठ्यावधी निधी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे देवणी सह लातूर जिल्ह्यातील एकही तालुका न्यायालायची इमारतीविना राहणार नाही त्यासाठी आपण बांधील असल्याचे सांगितलेआचलिया यांनी सांगितले ङ्गलातूर जिल्ह्य हा नावरत्नचा जिल्हा आहे न्यायदान क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. शिक्षण क्षेत्रात लातूरचा नावलौकिक आहे या शैक्षणिक प्याटर्न सबत न्यायालयाने ही एक लातूर प्याटर्न निर्माण करावा असे मत व्यक्त केले. या कोनशिला अनावरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्ह्य न्यायालयाच्या सर न्यायाधीश वृषाली जोशी ह्या होत्या यांनी अथक परिश्रम घेऊन या कोनशीला अनावरण सोहळा कार्यक्रम आयोजित केल्या होत्या. जात जात न्याय मूर्ती आचलिया माणसा (पान १ वरून) पुढे म्हणाले मि एक सामान्य माणूस आहे निसर्गाचा वारंवार प्रकोप होऊन लातूर जिल्ह्याला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे यावर मात करण्यासाठी सर्वाधिक वृक्षारोपण होणे गरजेचे प्रत्येक कुटूंबानी एकतरी झाडे लावून त्यांचे सांभाळ केली पाहिजे असे सांगून न्यायमूर्ती आचलिया यांच्या हस्ते न्यायालायची परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. न्यायालयासाठी आपली शेतीची जागा उपलब्ध करून दिलेल्या शेतकऱ्यांचा न्याय मूर्ती विजय आचलिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील वकील बार संघाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते तर लातूर जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक कुडते देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे व जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.