अँड.वैजनाथ राऊत यांना अखेरचा निरोप...

 


अँड.वैजनाथ राऊत यांना अखेरचा निरोप...


लातूर,दि.25.लातूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ नोटरी वैजनाथ शंकरराव राऊत यांचे मंगळवार,दि.२४ मार्च 2020 रोजी रात्री1.30 मिनिटांनी पुणेच्या रूबी हाँल मध्ये शुगरवर उपचार सुरू असताना प्राणोत्क्रमण झाले.ते 85 वर्षांचे होते..पुणे येथील भवानी पेठेत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.त्यांच्या पश्चात मुलगा नोटरी अँड.विजय राऊत,पत्नी,स़ून,नातवंडे,दोन भाऊ,पुतणे असा परिवार आहे.गेली सहा महिन्यापासून त्यांच्यावर रूबी हाँल मध्ये उपचार सुरू होते.लातूरच्या सम्राट चौकातील,स्वातंत्र्य सेनानी शंकर राऊत यांचे सुपूत्र असलेल्या वैजनाथ राऊत यांनी अतिशय कष्टाने वकिलीची पदवी घेवून सेवा केली..लातूरमध्ये त्यांनी 40 वर्षे नोटरी म्हणून ही सेवा केली.काही वर्षे प्रिंटींग प्रेस चालविली..अतिशय भिडस्त स्वभावाच्या अँड.वैजनाथ राऊत यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.लातूर जिल्हा वकील मंडळाने त्यांना श्रध्दांजली अर्पण केली..